Spread the love

पिंपरी, दि. १ एप्रिल २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत प्रभाग क्र. २१ पिंपरी मधील गावठाण व कॅम्प परिसरातील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, समाजविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे, महापालिका हद्दीतील मौजे पिंपळे गुरव, रहाटणी, ताथवडे येथील रस्त्याने/आरक्षणाने बाधित जागा ताब्यात घेणे, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वापरात नसलेले अथवा दुरावस्थेत अथवा मोडकळीस अवस्थेत असणारे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा सर्व्हे करून निष्कासित करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version