Spread the love

पिंपरी (पुणे): हार्ट प्रकाशन, पुणे यांच्या तर्फे प्रकाशित अजित पर्व या लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या दैदीप्यमान जीवन कार्याचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करून अत्यंत दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.

यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते.लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या दैदीप्यमान जीवन प्रवासाचा, कार्य संस्कृतीचा, शिस्त प्रिय कार्यक्षम नेतृत्वाचा,निर्णयक्षम विकास दृष्टी आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा वस्तुनिष्ठ व अचूक वेध घेणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल.लेखक प्रकाश जाधव यांनी संशोधन, संदर्भ व वास्तववादी मांडणीच्या द्वारे अजितदादांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत.

यावेळी पुस्तकाचे लेखक प्रकाश जाधव, प्रकाशक विनोद शिंदे( हार्ट प्रकाशन पुणे), सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, अॅड लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे, किरण खोत यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्य प्रेमी तसेच अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा प्रकाशन सोहळा केवळ एका पुस्तकाचा नव्हता तर महाराष्ट्राच्या एका कार्यक्षम, दूरदृष्टीच्या लोकाभिमुख नेतृत्वाला पुस्तक रूपाने दिलेल्या आदरांजली चा होता.

Share.
Leave A Reply

Exit mobile version