Spread the love

पिंपरी | प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, इंद्रायणी नगर यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी क्र. ११२, पोखर्णी येथील वारकरी भाविकांसाठी अन्नदान तसेच मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात मोठ्या संख्येने वारकरी भाविकांनी लाभ घेतला. वारकरी बांधवांना प्रेमपूर्वक भोजन देण्यात आले तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. अश्रुबा कोरपे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मानंद कोरपे, तानाजी साठे, विशाल मोकाशी पुरुषोत्तम कोरपे ,मधुकर पुट्टे,ज्ञानोबा मोकाशी,कृष्णा कोरपे,संजय हाक्के,श्री भागवत मोकाशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

“सेवेतून परिवर्तन” या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवेचे विविध उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा संकल्प संस्थेचे पदाधिकारी श्री तानाजी साठे यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version