पिंपरी -प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघ ही राज्यव्यापी संघटना आपल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाशी सल्लग्न संघटना आहे. राज्यामध्ये सातारा,सांगली,कोल्हापुर,मुंबई , नविमुंबई ,रायगड,धाराशिव,संभाजीनगर,नागपुर, चंद्रपुर,वाशीम,पुणे,पिंपरी चिंचवड ,नाशिक,व इतर ठिकाणी जवळपास वीस हजार सभासद,पदाधिकारी व हितचितंक शिवशाही व्यापारी संघ ,शिवशाही वाहतुक आघाडी, शिवशाही महीला आघाडी,शिवशाही बँड कलाकार आघाडी यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी काम करीत आहे.
साहेब राज्यामध्ये व्यापारी वर्ग बँड कलाकार बांधव व तृतीयपंथी भगिनी यांचे नेतृत्व करण्यासाठी शिवशाही व्यापारी संघटनेला एक जागा राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्यासाठी सकारात्मक विचार करून प्रतिनीधीत्व करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
