Spread the love

वालचंदनगर:- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून उत्कृष्ट व्यवस्थापन होत असल्याने स्वामी भक्तांना सुलभ महाप्रसाद मिळत असल्याने दर्शनानंतर अन्नछत्रात येऊन आम्हा भक्तांना महाप्रसाद घेतल्याचे मोठे समाधान असल्याचे मनोगत वालचंदनगर इंडिस्ट्रिज लि. मधील आय. एम. डी. कामगार समन्व्य संघ वालचंदनगर माजी अध्यक्ष नंदकुमार गोंडगे यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आल्या असता न्यासाचे अप्पू पुजारी, यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

यावेळी, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, योगेश कटारे, राहुल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version