Spread the love

चाकण : : श्री क्षेत्र कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारासंदर्भात वस्तुस्थितीवर आधारित बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून, स्थानिक पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कळस बुद्रुक येथील पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांच्यावर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या प्रकरणात पोलीस पाटील तथा ट्रस्टच्या सचिवाने संगनमत करून एक बनावट पत्र तयार केले आणि पत्रकाराची सामाजिक प्रतिमा मलीन करण्यासाठी ते व्हाट्सअँप ग्रुपवर व्हायरल केले. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊनही पोलीस पाटील “घरातील व्यक्ती आयसीयूमध्ये आहे” अशी बतावणी करून पोलीस स्टेशनला येण्यास टाळाटाळ करत आहेत. या प्रकारामुळे चाकण परिसरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version