Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 20, 2024Updated:October 20, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना
– भाजपाकडून महायुतीची अधिकृत उमेदवारी घोषित

पिंपरी । प्रतिनिधी
सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी मला २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडून दिले. त्यावेळी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे या मुद्यांवर मी निवडणुकीला सामोरा गेलो होतो. तत्कालीन प्रस्थापितांविरोधात शहरवासीय व भूमिपुत्र माझ्यासोबत राहीले. त्यामुळेच मी आजवर यशस्वीपणे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासले आहे, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे भोसरीतून पुन्हा एकदा आमदार लांडगे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकीत मी पिंपरी-चिंचवडकरांकडे मतरुपी ‘दान’ मागितले. त्यामुळे माझ्या भोसरी विधानसभा मतदार संघातील ३४ सहकाऱ्यांना महानगरपालिका सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवले. महापालिकेतील भाजपाची सत्ता असताना राज्यात २०१९ मध्ये सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीची सत्ता, कोविड महामारी यामुळे विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. काही विकासकामांचा निधी वळवण्यात आला, काही कामे हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवण्यात आली. काही प्रकल्प रखवडवण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ मध्ये मी पुन्हा आपल्यासमोर आलो. त्यावेळीसुद्धा नागरिकांनी माझ्यावरील विश्वास किंचतही कमी होवू दिला नाही. आता पुन्हा मी २०२४ मध्ये निवडणुकीला सामोरा जात आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
*****

१० वर्षे विकासाची… निरंतर विश्वासाची..!
गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये सोडवलेले प्रश्न, मार्गी लावलेले विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या, सोसायटीधारकांच्या हितासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय यासह भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेला लढा… अशा ‘रिपोर्ट कार्ड’च्या आधारे ‘‘१० वर्षे विकासाची.. निरंतर विश्वासाची..’’ असे घोषवाक्य घेवून मी भोसरी विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या निमित्ताने पुन्हा निवडणुकीला सामोरा जात आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यांचा आदर्श घेवून राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहीन, असा विश्वासही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया :
गेल्या १० वर्षांतील विकास कामे आणि मार्गी लावलेले प्रलंबित प्रश्न याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडणार आहे. ‘‘विकास ही निरंतर प्रक्रिया आहे..’’ अशी माझी भावना आहे. आगामी काळात प्रस्तावित सर्व विकासकामे मार्गी लावण्याचा माझा संकल्प आहे. शहराच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी मी निवडणुकीला सामोरा जात आहे. सूज्ञ पिंपरी-चिंचवडकर माझ्यासोबत आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleजगविख्यात होमिओपॅथिक डॉक्टर अमरसिंह निकम यांचे हृदयविकारावरील पुस्तक स्पॅनिश भाषेत प्रकाशित.
Next Article भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.