Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 11, 2025No Comments3 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश

निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदारांकडून “पत्ते ओपन” करायला सुरुवात!

पिंपरी, 11 नोव्हेंबर (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी आपले “पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भेटीगाठी, सोसायट्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देत असतानाच दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही केले जात आहेत. या माध्यमातून नुकताच शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवक यांच्या पत्नीसह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश मंगळवारी केला गेला.

भारतीय जनता पक्षाचे आमदार, पक्षाचे माजी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सरसावलेले आहेत. महापालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शांत, संयमी आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या आमदार शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तीस लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील मतदारांसमोर भाजपने पिंपरी चिंचवड शहरासाठी पक्षाचा “ब्रँड फेस” म्हणून जगताप यांना निवडणुकीची कमान सोपवली आहे.

पक्षाने टाकलेली जबाबदारी सांभाळत आमदार जगताप यांनी आता आपले ‘पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे. याच माध्यमातून बैठका, पदाधिकाऱ्यांची चर्चा, गृहनिर्माण संस्था तसेच सोसायट्यांमध्ये संवाद मेळावे आयोजित केले जात आहेत. यामध्ये नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करत त्यावर आमदारांकडून तोडगा काढला जात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

उबाठा गटाला धक्का!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची कमान सांभाळताच आमदार शंकर जगताप यांनी शिवसेना उबाठा गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेचे दिवंगत  माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ आणि शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १७ मधील आजी माजी पदाधिकारी तसेच भाजपचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

यांनी केला पक्षप्रवेश!

सुरेखा वाघ, मंदाकिनी वाघ, सारिका बागुल, रवींद्र पाटील, वंदना पाटील, रमेश भदाणे, सुनंदा भदाणे, रमेश बिरारी, प्रदीप भदाणे ,रामेश्वर ईशी, नितीन पाटील ज्ञानेश्वर महाजन, विठोबा महाजन, पल्लवी वाघ, रवींद्र महाजन, नितीन महाजन, भाऊसाहेब महाजन, भाऊसाहेब पेंटर, प्रशांत अहिरे,युवराज अहिरे , आशा अहिरे, पूजा अहिरे, वाल्मीक पाटील, गायत्री पाटील, रवींद्र जगताप, आर के महाजन, योगेश माळी यांनी भाजपमध्ये शिवसेनेतून प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मेट्रो रस्त्यांचे प्रशस्त जाळे, सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय, नवनवीन प्रकल्प यामधून शहराचा कायापालट झालेला सर्व नागरिकांनी पाहिला आहे. येथील नागरिकांचा भाजपला पाठिंबा आहे. आगामी काळात शहर भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांची मागणी, पदाधिकाऱ्यांचा आग्रह यातून शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रजनी रघुनाथ वाघ

भाजपने पिंपरी चिंचवड शहराच्या निवडणूक प्रमुख म्हणून शहराची जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यात येईल. नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. भाजपामध्ये येण्यास शहरातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार भाजपकडे आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक नक्कीच यशस्वी होणार आहे. या निवडणुकीत महापौर हा भाजपचाच असेल असा विश्वास आहे.

शंकर जगताप
निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभागात आरक्षण जाहीर.
Next Article प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर-तळवडे मध्ये मोफत आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.