इंदापूर : प्रतिनिधी – गणेश मोरे
शासकीय गोदामातील रेशनचा गहू परस्पर काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना वालचंदनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५०० गोण्या रेशन गहू आणि १२ टायर ट्रक असा एकूण २१ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी काशिनाथ साहेबराव नागराळे, पोलीस हवालदार १८४०, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण. यांनी तक्रार केली आहे.
त्यानंतर 1) विलास नारायण गावडे, वय ५३ वर्षे, धंदा चालक, रा. डाळज नं. २, ता. इंदापूर, जि. पुणे.
२) सतीश सुखदेव हगारे, रा. हगारेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल – एकुण २१,२५,०००/- रुपये
१) ६,२५,०००/- रुपये किमतीचा एकूण ५०० गोण्या गहू भरलेल्या गोण्या. प्रत्येक गोणीचे वजन अंदाजे ५० किलो, प्रति किलो भाव २५ रुपये प्रमाणे.
२) १५,००,०००/- रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा १२ टायर ट्रक, आर.टी.ओ. नंबर MH ४२ BF ३५२२ आरोपी क्र. १ व २ यांनी संगनमत करून, आरोपी क्र. २ च्या मालकीचा १२ टायर ट्रक (MH ४२ BF ३५२२) मध्ये सोलापूर येथील शासकीय गोदामातून भरलेला ६,२५,००० रुपयांचा रेशनचा गहू, मोहोळ येथील शासकीय गोदामात खाली करायचा होता, तो तेथे न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा विश्वासघात करून अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये परस्पर घेऊन जात असताना बोरी चौक, लासुर्णे येथे आरोपी क्र. १ मुद्देमाल व ट्रकसह मिळून आला.
याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक घोरपडे हे करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून गोपाळ पवार हे काम पाहत आहेत.

