पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
पँथर संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेप्रती असलेली आपली बांधिलकी कृतीतून दाखवावी. ज्यांना पँथर संघटनेत मनापासून काम करायचे आहे, त्यांनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पँथर संघटनेचा अधिकृत लोगो स्वाभिमानाने लावावा आणि अन्याय, अत्याचार व भेदभावाविरोधात निर्भयपणे आवाज उठवावा, असे आवाहन पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय नडगेरी यांनी केले.
ते म्हणाले, “पँथर संघटना ही सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांसाठी कार्य करणारी चळवळ आहे. संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा समाजाच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पँथर संघटना ठामपणे उभी आहे.”
यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेची ओळख अभिमानाने जपत अधिकाधिक लोकांपर्यंत संघटनेचे विचार पोहोचवावेत, असेही आवाहन संजय नडगेरी यांनी केले.

