पिंपरी, दि. १५ ऑगस्ट २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भारत हा सर्वात मोठा शेतीप्रधान आणि लोकशाही मानणारा देश असल्याचे सांगितले. भारतात विविध धर्मांचे, भाषा बोलणारे नागरिक एकत्रितपणे राहतात आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे तसेच विविध क्षेत्रांत देशासाठी योगदान देणाऱ्या महामानवांचे नेहमी स्मरण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शहर कार्यकारिणीत भोसरी विधानसभा कार्याध्यक्षपदी अकबर मुल्ला, सरचिटणीसपदी राजेंद्र पवार, अर्बन सेल अध्यक्षपदी सचिन गायकवाड, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सेवादल सेल शहर कार्यकारिणीत चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी महेश माने, शहर राष्ट्रवादी सेवादल उपाध्यक्षपदी राजू भीमा लोणके, दीपक कार्की, गणेश ताम्हाणे, राम खरात, भोसरी विधानसभा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर रघुनाथ भालेकर, आकाश प्रदीप शेंडे, अमोल धनाजी कदम, सरचिटणीसपदी धनराज अवधूत सूर्यवंशी आणि चिटणीसपदी अमित नथु थोरात यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे आणि भोसरी विधानसभा सेवादल अध्यक्ष प्रवीण पिंजन यांनी केले.
या कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, सारंग कामतेकर, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा जगताप, नगरसेवक विक्रांत लांडे, राजेंद्र जगताप, नगरसेविका निकिता कदम, सविता आसवानी, विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कोकणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कैलास बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, शेरबहादूर उर्फ मायला खत्री, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, विशाल काळभोर, दीपक साकोरे, रवींद्र ओव्हाळ, युवराज पवार, श्रीकांत कदम, युसुफ कुरेशी, संग्राम चव्हाण, प्रशांत महाजन, दत्तात्रय जगताप, अरुण पवार, शक्रुल्ला पठाण, संपत पाचुंदकर, तुकाराम बजबळकर, प्रवीण गव्हाणे, महेश झपके, बाळासाहेब पिल्लेवार, अंकुश दिघे, नवनाथ डफळ, काळुराम खेडकर, गोरोबा गुजर, लहू तोरणे, रवींद्र सोनवणे, बापू सोनवणे, जहीर उर्फ छोटू खान, महेश किर्वे, उदय कुलकर्णी, महेश माने, प्रा. संतोष भांगे, शहाजी आतकर, भाग्यश्री मस्के, नीलम कदम, देवी थोरात, क्षमा सय्यद, स्वराज शिंदे, इमरान शेख, अविनाश सोनवणे, उदय ववले, सुनील जाधव, अंकुश दिघे, रमजान सय्यद, धनाजी तांबे, सुनील अडागळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

