पुणे प्रतिनिधी : विकास क्षत्रिय
बाल शिशु मंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी विविध रंग, मणी, सजावटीच्या साहित्याचा वापर करून सुंदर व नाविन्यपूर्ण राख्या बनवल्या.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांचे शाळेत प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या पाहून पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने राख्या खरेदी केल्या. आपल्या पाल्याने स्वतः तयार केलेली राखी खरेदी करताना पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला, आत्मविश्वासाला व उद्योजकतेला चालना मिळाली. तसेच ‘स्वतः तयार करा आणि त्याचे मूल्य जाणून घ्या’ हा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.
या उपक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका शितल पांगुळ मॅडम सहशिक्षिका तृप्ती पांगुळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करून शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

