मोशी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथे कृष्णजन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी माननीय संस्थाध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका सौ. कविता भोंगाळे-कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत, विपणन अधिकारी श्री शैलेंद्र सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला केवळ धर्माची शिकवण दिली नाही, तर सत्य, कर्तव्य, प्रेम, मैत्री आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा संदेश दिला. आजच्या काळात श्रीकृष्णांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण— निसर्गाचे रक्षण करूया, समाजात प्रेम व बंधुभाव वाढवूया, गरजूंच्या मदतीसाठी पुढे येऊया, व्यसन, हिंसा आणि भेदभावापासून दूर राहूया, शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातून समाज घडवूया.
“स्वतःच्या आनंदासोबत इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करणे व
या जन्माष्टमीला भक्तीसोबत मानवतेचीही गोकुळ उभारूया असे आवाहन माननीय संस्थाध्यक्ष श्री विनायक भोंगाळे यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी केले.
शिक्षण, क्रीडा, वाचन संस्कृती सोबतच भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य गायत्री स्कूल तर्फे वेळोवेळी करण्यात येते असे पालकांच्या प्रतिक्रियेतून निष्पन्न झाले.

