Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड ‘एज्युकेशन हब’च्या संकल्पाला आता संशोधनाची जोड!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comSeptember 29, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिखलीतील ८०० कोटींच्या बॅटरी संशोधन केंद्राची उभारणी

– सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्सचा करार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडला ‘एज्युकेशन हब’ बनवण्याच्या संकल्पाला आता प्रगत संशोधनाची जोड मिळणार आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स यांच्यात चिखली येथील रिसर्च पार्कमध्ये स्वदेशी बॅटरी संशोधन व विकास केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. ८०० कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात उद्योग, संशोधन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे. चिखलीतील हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षमतेला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करारावर सीओईपीतर्फे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे आणि जेएसडब्ल्यू समूहातर्फे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवाणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

प्रस्तावित केंद्रात लिथियम-आयन, सोडिअम-आयन आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी सेलचे संशोधन, प्रोटोटायपिंग व प्रमाणीकरण होणार आहे. केंद्र दोन टप्प्यांत विकसित करण्याचे नियोजन असून, त्यातून एक हजार रोजगारसंधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना आणि युवा अभियंत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष काम करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते.  या भागीदारीबाबत जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी, “सेल हे या शतकातील नवीन इंधन असून हे सेल भारतातच तयार करण्याची वेळ आली आहे,” असे म्हटले आहे. सीओईपीसोबतची भागीदारी उद्योग, संशोधन आणि शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडला ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ तसेच सीओईपी आणि आयआयएम नागपूरच्या शैक्षणिक संधी शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. आता चिखलीतील बॅटरी संशोधन केंद्रामुळे या संकल्पात उद्योगाशी जोडलेल्या संशोधनाची भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झालेल्या भागीदारीबद्दल लांडगे यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्सचे अभिनंदन केले. प्रस्तावित गुंतवणुकीतून दर्जेदार संशोधन, कौशल्यविकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया :

“पिंपरी-चिंचवडची ओळख औद्योगिक शहर म्हणून आहे. आता या औद्योगिक सामर्थ्याला शिक्षण आणि स्वदेशी संशोधनाची जोड देण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीतील हा प्रकल्प युवा अभियंत्यांसाठी नवी संधी निर्माण करेल. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स यांचे मनापासून आभार आहेत. प्रस्तावित गुंतवणुकीतून स्थानिक युवकांना कौशल्य आणि रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण होतील, असा विश्वास आहे.
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleअनिल पाराजी सोमवंशी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भोसरी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती
Next Article मोशीत ४ ऑक्टोबरला पुन्हा घुमणार हजारो ढोल-ताशांचा निनाद!
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.